दर्यापूर (प्रतिनिधी)- अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे हे स्वतःची टिमकी वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला नख लावत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.दिनेश सूर्यवंशी यांनी करून आमदारांनी जिल्ह्यात नाक खुपसू नये असा इशाराही दिला आहे.
काल सूर्यवंशी यांनी आमदार बुंदीले यांच्या जनसंपर्क कार्यालयात तातडीची पत्रपरिषद घेऊन आमदार भारसाकळे याना सज्जड दम दिला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन भारसाकळे यांनी अंजनगाव आणि दर्यापूर येथे खा.अडसूळ यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या आणि त्यात स्वतःची टिमकी वाजवली याबद्दल सूर्यवंशी यांनी आमदारांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
अकोटचे आमदार केंद्रात मोदींची सत्ता येण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोपही यावेळी सूर्यवंशी यांनी केला. या पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष विजय मेंढे, शहर अध्यक्ष अनिल कुंडलवाल ,अंजनगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेशवर दालु, शहर अध्यक्ष मुन्ना पटेल, रवींद्र गोळे, संजय पोटे उपस्थित होते.
अधिक वाचा : मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग मतदानासाठीमतदान केंद्रावर पोहचणे आवश्यक-विभागीय आयुक्त पियुष सिंग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola