अकोला (प्रतिनिधी) :- दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान होण्याचे दुष्टीने मतदानाच्या दिवशी प्रत्येक दिव्यांग मतदान केंद्रावर पोहचला पाहिजे याबाबत खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त तथा दिव्यांग मतदार निवडणुक निरिक्षक पियुष सिंग यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनात दिव्यांग मतदारांसाठी करण्यात आलेल्या तसेच स्विप अंतर्गत करण्यात आलेल्या जनजागृतीचा आढावा घेतांना ते बोलत होते. या वेळी निवडणुक निरिक्षक सामान्य विनोद सिंह गुंजीयाल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी शिवाजीराव दावभट, निवडणुक निरिक्षक सामान्य यांचे संपर्क अधिकारी गोपाळ माळवे, दिव्यांग मतदार जागृतीकरिता आयकॉन प्रा.विशाल कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान अपेक्षीत असून त्याकरिता दिव्यांग मतदारांचे घरो-घरी जावून येत्या दोन दिवशात संपर्क करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांनी मतदार चिठ्ठी वाटप करतांना दिव्यांग मतदारांशी प्रत्येक्ष संपर्क करावा. जिल्हा प्रशासनाने दिव्यांग मतदारासह गरोदर महिला व वृध्द मतदारांसाठी ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, मतदान केंद्रावर व्हील चेअर, मेडीकल किट, पिण्याचे पाण्याची उपलब्धता करुन द्यावी त्याचप्रमाणे मतदान करण्याकरिता लागणारे विविध 11 प्रकारच्या ओळख पत्रांची माहिती सर्व मतदारांपर्यंत पोहचविण्यात यावी यासाठी मतदान केंद्रावर माहिती दर्शक फलक लावण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.
दिव्यांग संघटनेचे अवचार यांनी दिव्यांग जनजागृती संमेलन घेवुन तिन चाकी मोटर सायकलवर एक दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगाला बसवून मतदानासाठी आणनार असल्याचे सांगीतले यासाठी सर्व तालुका तसेच ग्रामीण भागातील मोठ्या गावात व्यवस्था केलेली आहे याबद्दल माहिती दिली. विभागीय आयुक्त यांनी त्यांचे कामाची प्रशंसा करुन मतदानाचे दिवशी प्रशासनाची समन्वय साधून जास्तीत जास्त दिव्यांगाना मतदान प्रक्रियेत सहभागी करावे असे आवाहन केले. दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यमातून प्रा.विशाल कोरडे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी फेसबुकवर मी मतदान करणार या लिंकवर जावून भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी निवडणुक संदर्भातील विविध तयारींचा आढावा घेतला.
अधिक वाचा : अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे हे मोदींच्या मार्गात अडथळा- प्रा.दिनेश सूर्यवंशी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
थोडी बातमी लेट येते बाकी काही नाही