तेल्हारा(प्रतिनिधी)– तेल्हारा येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या शिक्षकाने शिक्षकी पेक्षेला काळिमा फासण्याचे काम केले असून आपल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.
तेल्हारा शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थे मध्ये शिक्षकीपेशे मध्ये असलेल्या एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीला आपल्या हवसेच्या नजरेला बळी पाडले असून मार्क वाढवून देतो असे बतावणी करून अश्लील असे मोबाईल वर मेसेज करून तिचा विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली. एका शिक्षण संस्थेवर शिक्षक म्हणून असलेला शिक्षकाने आपल्या पेक्षा निम्या वयाच्या विद्यार्थीनि सोबत मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने मोबाईल वर अश्लील मेसेज करून त्या विद्यार्थीनीचा विनयभंग केला तसेच जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. शिक्षकी पेक्षेला काळिमा फासणाऱ्या महेश पाथरीकर या शिक्षकविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात विद्यार्थीनीच्या नातेवाईकाने तक्रार दाखल केली असता आरोपी शिक्षका विरुद्ध कलम ३५४,३५४(ड),५०६ भांदवी ११(४)१२ लेगिक अत्याचार बाल सरंक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : विनापरवानगी सभा घेतल्याने कॉग्रेस विरुध्द आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola