मुंबई : फेसबुकने नुकतेच मेसेंजर, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम या तीन सेवांचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकच्या या निर्णयामुळे व्हॉट्सअपच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘द वायर्ड’ या अमेरिकी मासिकाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. व्हॉट्सअप चॅट एंड-टू-एंड इन्क्रिप्ट केलेले असते. तर, फेसबुक मेसेंजरमध्ये देखील गुप्त संवाद (सीक्रेट कन्व्हरसेशन) नावाचे फीचर असते. हे फीचर युजर टर्न ऑन करू शकतो. परंतु, इन्स्टाग्राममध्ये चॅट संरक्षित करण्यासाठी एंड-टू-एंड इन्क्रिप्शनसारखी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक जेन कूम यांनी डेटा प्रायव्हसी (गोपनीयता) आणि इन्क्रिप्शनबाबत मार्क झुकरबर्ग यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर कंपनी सोडली होती. कूम हे व्हॉट्सअॅप यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत आग्रही होते.
फक्त व्हॉट्सअॅपमध्ये एंड-टू-एंड इन्क्रिप्शन आधीपासूनच आहे. अशात इन्क्रिप्शनची गरज नसलेल्या क्रॉस अॅप ट्रॅफिकला अनुमती देणे हा जर फेसबुकचा उद्देश असेल, तर विचार करा, काय होऊ शकते, असे वक्तव्य जॉन हाफकिन्सचे क्रिप्टोग्राफर मॅथ्यू ग्रीन यांनी केले आहे. हा प्रकार आव्हानात्मक असल्याचे ग्रीन यांनी म्हटले आहे.
तुमच्याकडे व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केलेला आहे, आणि तु्मच्याकडे इन्स्टाग्राम किवा मग मेसेंजर मात्र इन्स्टॉल केलेले नाही. अशा वेळी या तीन सेवांचे एकत्रिकरण नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मेसेंजर किंवा इन्स्टाग्रामवर चॅट करू शकणार नाही. मात्र, फेसबूकने या तीन सेवांचे एकत्रिकरण केल्यास तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे मेसेंजर किंवा इन्स्टाग्रामवर चॅट करू शकता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola