* सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळून अपघात झाल्यावर किरण हागे यांनी स्वतः बुजविले राज्यमार्गावरील खड्डे
हिवरखेड (दीपक रेळे)- ज्याप्रमाणे सत्यघटनेवर आधारित असलेल्या मांझी चित्रपटात दशरथ मांझी हा शासनाच्या नाकर्तेपणाला कंटाळून रस्ता नसल्याने स्वतः पहाड फोडून टाकतो त्याच धरतीवर वर्षानुवर्षे रस्त्याची दुर्गति झाल्याने एका शेतकऱ्याने स्वतः खड्डे बुजविल्याने प्रशासनाला ही बाब लाजवणारी ठरत आहे.
हिवरखेड ला दोन राज्यमार्ग प्रकरण उजेडात आले आहे लाभले आहेत एक अकोट जळगाव जामोद जाणारा राज्यमार्ग क्रमांक 47 आणि आडसुल ते हिवरखेड जाणारा राज्यमार्ग क्रमांक 279आहे. परंतु सरकार, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वर्षानुवर्षे या दोन्ही महामार्गांची प्रचंड दुर्गती झालेली आहे. करोडो रुपये खर्च करून नेहमी थातूर-मातूर दुरुस्ती करून मलिदा लाटण्याचा प्रकार नित्याचाच आहे. गल्ली ते दिल्ली एकच पक्षाचे सरकार असतानाही संबंधित लोकप्रतिनिधींच्या प्रचंड निष्क्रियतेमुळे हा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतरही हे काम सुरु होण्यास प्रचंड उशीर झाला. त्यातही फक्त रस्ता खोदून ठेवल्याने प्रचंड धुळीच्या आणि खडकांच्या साम्राज्याने नागरिक अनेक महिने प्रचंड धुळीच्या आणि खडकांच्या साम्राज्याने आधीपासून त्रस्त आहेत.
हिवरखेड येथील अल्पभूधारक शेतकरी किरण प्रकाश हागे हे आपल्या मुलाची तब्येत बरोबर नसल्याने त्याला आकोट येथील दवाखान्यात उपचार करून हिवरखेड येथे घरी परत येत असताना रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. आणि त्यांच्या दुचाकीची रिंग पूर्णपणे चेंदामेंदा झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे किरण हागे यांचे शेतात जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता असल्यामुळे ते अनेक वर्षापासून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वैतागलेले होते. आता हा अपघात झाल्याने किरण हागे यांनी सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळून शेवटी स्वतःला शक्य होईल तेवढे खड्डे बुजविण्याचा निर्धार व्यक्त केला. माझा अपघात झाला पण यापुढे इतर कोणाचा अपघात होऊन जीवित हानी होऊ नये म्हणून स्वतः घमेले फावडे घेऊन दुसऱ्याच दिवशी खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. निरंतर परिश्रम घेत किरण हागे यांनी एकट्यानेच जवळपास एक किलोमीटर पर्यंतचे खड्डे एकाच दिवसात बुजविण्याचा पराक्रम करून दाखवला. आणखी शक्य तेवढे खड्डे बुजविणार असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी स्वतः खड्डे बुजविण्यास सुरुवात करणे म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब केल्यासारखेच असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. सदर रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल याबाबत स्पष्टपणे सांगण्यास कोणीही तयार नाही.
वर्षानुवर्षे रस्त्यांची दुर्गती झालेली असून संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी अकार्यक्षम असल्याचे सिद्ध होते. या रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे सदर रस्त्याचा मी बळी ठरलो होतो यापुढे कोणी बळी पडू नये म्हणून स्वतः खड्डे बुजवण्याचे काम केले
किरण प्रकाश हागे
(खड्डे बुजविणारे शेतकरी)
अधिक वाचा : हिवरखेड जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे चोरट्यांचा संगणकावर डल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola