अकोला (प्रतिनिधी) : दिनांक 10 मार्च 2019 पासुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 ची प्रक्रिया सुरु झालेली आहे, दिनांक 06 एप्रिल 2019 रोजी हिंदु धर्मियांच्या वतीने गुढी पाडवा साजरा करण्यात येणार आहे, दिनांक 07 एप्रिल 2019 रोजी सिंधी बांधवांचे वतीने चेट्री चेंडू झुलेलाल उत्सव साजरा करण्यात येणार आहे, दिनांक 13 एप्रिल 2019 रोजी श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे, दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी बौध्द बांधवांचे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे, दिनांक 17 एप्रिल 2019 रोजी जैन बांधवांचे वतीने माहाविर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे व दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी जिल्हयात सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 चे अनुषंगाने मतदान घेण्यात येणार आहे.
उपरोक्त मुद्ये लक्षात घेता, अकोला जिल्हयात वरील काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यसाठी पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर अकोला यांनी कलम 36 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये अकोला जिल्हयातील सर्व पोलीस उपनिरिक्षक व त्यांचेपेक्षा वरील दर्जाचे अधिका-यांना दिनांक 04 एप्रिल 2019 चे रात्री 12.00 वाजता पासुन ते दिनांक 18 एप्रिल 2019 चे रात्री 12.00 वाजेपर्यंत, रस्त्यावरुन जाणा-या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी? याविषयी निर्देश देणे, मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याचे किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे, अशा कोणत्याही मिरवणूका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल, ताशे, शिटया व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरे नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथीगृहाच्या) जागेत ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिका-यांनी हया अधिनियमांचे कलम 33, 36, 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आदी अधिकार प्रदान केले आहे.
वरील आदेशाचे कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस राहील असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
अधिक वाचा : सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग, ठेकेदाराला रस्ता चांगला करण्याचे आदेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola