अकोला (प्रतिनिधी) : शांतीपुर्ण, निपक्षपाती व निर्भयपणे निवडणूक प्रक्रिया पारपाडण्यासाठी अकोला लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन निवडणूक निरिक्षक सामान्य विनोद सिंह गुंजीयाल यांनी केले.
लोकसभा मतदार संघातील उमेदवारांशी तसेच त्यांचे निवडणूक प्रतिनिधींशी सुसंवाद साधतांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवनात ते बोलत होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थाचे निवडणूक निरिक्षक कुलदिपसिंह, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, निवडणूक खर्च विषयक समितीचे नोडल ऑफीसर तथा उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदी अधिका-यांची उपस्थिती होती.
उमेदवारांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे आपला खर्चा विषयीक माहिती रोजच्या रोज निवडणूक विभागाला कळवावी, मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देवू नये आदी सुचना श्री विनोद सिंह यांनी दिल्यात. सर्व प्रकारच्या परवानगी घेवूनच सभा, मेळावे, रोड शो आदी करावे, सभा व मेळावा आयोजीत करण्याची मुभा रात्री 10 पर्यंतच आहे याचे प्रत्येक उमेदवाराने काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारची आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक उमेदवाराने घ्यावी. बॅनर वर प्रकाशक व मुद्रकाचे नांव प्रसिध्द करणे आवश्यक आहे याची परवानगी घेवूनच बॅनर व पोस्टर छपाई करावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे पथक सतत कार्यरत असून उमेदवारांच्या विविध हालचालीवर लक्ष ठेवून आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्हीव्ही पॅडचा प्रथमच वापर होणार असल्यामुळे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्यात. एकल खिडकी योजनेद्वारे संपुर्ण परवानगी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. उमेदवारांना निवडणूकीचा खर्चाचा हिशेब देतांना अडचण येवू नये म्हणून दिनांक 30 मार्च 2019 रोजी उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधीसाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नियोजन भवनामध्ये नोडल अधिकारी अनिल खंडागळे यांनी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. कायदा व सुव्यवस्था बाबतची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर यांनी दिली.
या बैठकीला 06-लोकसभा मतदार संघातील 11 उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक वाचा : वाडेगाव श्री जागेश्वर इंग्लिश प्रायमरी व हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी लिहले आई बांबास पत्र
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola