अकोला(प्रतिनिधी)– आज दिनांक 28 मार्च 2019 रोजी पंचायत समिती बार्शीटाकळी चे वतीने VSTF अंतर्गत क्षमता बांधणी विषया बाबत ग्रामसेवक व ग्राम प्रवर्तक यांचे करीता दोन दिवशीय कार्यशाळा श्री सिध्देश्वर विद्यालय, धाबा ता बार्शीटाकळी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन आज मा श्री विलास खिल्लारे सर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अकोला यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ संदीप भंडारे गट विकास अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, श्री पुष्कर जंगले CM फेलो, कु माधुरी सरोदे vstf जिल्हा व्यवस्थापक,युवा संस्थेचे श्री सुरेश लुले,श्री व्ही एन रुद्रकार विस्तार अधिकारी पंचायत, शाहू भगत जनसंपर्क अधिकारी, श्री कराळे कृषी विस्तार अधिकारी हे उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन मा श्री विलास खिल्लारे, अतिरिक्त मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री डॉ संदीप भंडारे गट विकास अधिकारी, श्री पुष्कर जंगले,कु माधुरी सरोदे,शाहू भगत यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सदर कार्यशाळेला vstf च्या 22 गावातील ग्रामसेवक व ग्राम प्रवर्तक उपस्थित होते.
अधिक वाचा : समाजसेवक गजानन हरणे यांचा अकोला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola