अकोला (प्रतिनिधी) : एलएलबी प्रवेश घेणारे विद्यार्थी आणि सीएस परीक्षाला बसणाऱ्या विद्यार्थांची परीक्षा एकाच वेळी असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. या वेळापत्रकात बदल व्हावा यासाठी काही विद्यार्थांनी ऑनलाईन याचिका दाखल केली असून बुधवारी दिवसभरात ५० विद्यार्थांनी त्याला प्रतिसाद दिला.
राज्याच्या सीईटी सेल ने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा १ जून २०१९ रोजी होईल.
परंतु त्याच दरम्यान केंद्राकडून होणारी सीएस परीक्षा आहे . सीएस परीक्षा पास होणारे अनेक विद्यार्थी एलएलबी ला प्रवेश घेऊन विधी ची पदवी प्राप्त करतात. फक्त ३० टक्के विद्यार्थी हे एकाच वेळी दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण करतात. अशी माहिती स्टुडंट्स लॉ कॉन्सिल अकोला अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी दिली.
यामुळे एका परीक्षेला मुकावे लागले अशी भीती विद्यार्थांनी व्यक्त केली. तसेच ऑनलाईन याचिका दाखल केली. दरम्यान निवडणुकीच्या अंतिम मतमोजणी नंतरची पहिली तारीख प्रवेश परीक्षेसाठी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थांनी प्राथमिकता लक्षात घेऊन परीक्षा द्यावी अशी प्रतिक्रिया सीईटी सेल चे आयुक्त आनंद रायते यांनी केली.अधिक
अधिक वाचा : कायदा गाढव ,सगडे वकील लबाड ,मग न्यायाधिश सर्वांवर औषध आहे का ?
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola