वाडेगांव (डॉ शेख चांद) : भारत डोंगरे यांचे ग्राम पंचायत कार्यलय समोर दि २६ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजता पासून इ क्लास जमीनी वरील ग्राम पंचायत सदस्यांनी केलेले अवेंध अतिक्रमण काढणे विषयी आमरण उपोषणाला बसले आहे. आज रोजी उपोषण करत्याला उपोषण सुरू कऱ्याला ४८ तास झाले तरी शासना कडून कोणताही अधिकारी भेट देण्यासाठी आला नाही . जो पर्यंत अतिक्रमण काढले जात नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असे भारत डोंगरे यांनी सांगीतले . या संदर्भात दि १२ मार्च २०१९ ला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अकोला यांना तसेच मा. ठाणेदार साहेब बाळापूर तसेच इतर संबंधीत विभागात आमरण उपोषण संदर्भात पत्र दिले असून २६ मार्च पासून आमरण उपोषणास भारत कैलास डोंगरे यांनी सुरुवात केली . त्यांच्या उपोषणाला सरपंच , काही ग्रा पं सदस्य तसेच शामलाल लोध , दयाराम डोंगरे , राजेश डोंगरे, जगदीश लोध , अॅड सुबोध डोंगरे , राजवर्धन डोंगरे , विनोद राहुडकार , बाबुराव फाटकर , दिनेश धाडसे, मनोहर सोनटक्के, किशोर अवचार, युवराज डोंगरे, दत्ता मानकर , संजय तायडे, अशोक डोंगरे, दिपक सरदार , विजय इंगळे, आनंदा डोंगरे, केशव सरप, सहदेव अवचार इत्यादी उपोषण मंडपात उपस्थीत होते. बंदोबस्त साठी स्वतः एपीआय वैभव पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.
आता भारत डोंगरे इ क्लास जमीनी वरील ग्राम पंचायत सदस्यांनी केलेले अवेंध अतिक्रमण काढणे विषयी यांनी केलेले आमरण उपोषणा कडे गावकऱ्यांनचे लक्ष लागले आहे की संबंधीत विभाग काय कार्यवाही करते?
ग्राम विकास अधिकारी डी एस अंभोर , सरपंच सौ अन्नपुर्णा मानकर : – भारत कैलास डोंगरे यांनी दिलेल्या आर्जाचा विचार करून संबंधीत विभाग व पोलीस प्रशासनाला पत्र दिले असून संबंधीत विभागाचे आदेश आल्यास कायदयानुसार रितसर कार्यवाही करण्यात येईल.
अधिक वाचा : वाडेगांव येथील शेख रशीद मिस्त्री यांचा अपघाती मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola