अकोला(प्रतिनिधी)– काल मुंबई विद्यापिठा अंतर्गत येणार्या शासकीय विधी महाविद्यालय येथे एल एल बी पदवी घेणार्या तीन आणि पाच वर्षाच्या विद्यार्थांची ड्राफ्टींग विषयाची परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये कायदा गाढव,सर्व वकील लबाड, मग न्यायाधिश सर्वांवर औषध आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नामुळे वकीलही चकावले आहेत उद्याचे वकील असलेल्या लाॅ च्या विद्यार्थांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याचे शिक्षण देणारेच जर अश्या प्रकारचे प्रश्न विचारून विद्यार्थांचे खच्चीकरन करत असतील तर हे व्यवसायाकडे उत्तम पर्याय म्हणून कसे पाहु शकतील.
या घटनेचे संपुर्ण गांभीर्य लक्षात घेऊन स्टुडंट्स लाॅ कौन्सिल अकोला तर्फे आज जिल्हाअधिकार्यांना निवेदन देवुन परीक्षेमध्ये असे आक्षेपार्य प्रश्न कोनी विचारले आणि त्याला परवानगी कशी मिळाली यावर चौकशी स्थापन करून जबाबदार व्यक्तीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी स्टुडंट्स लाॅ कौन्सिल अकोला अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी केली.
अधिक वाचा : सम्रग शिक्षा अंतर्गत अकोला जिल्हातील प्रथम इंटर्नशिप पुर्ण करणाऱ्या विद्यार्थाचा कौतुक सोहळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola