हिवरखेड(प्रतिनिधी) : अकोला जिल्हयातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम कार्ला येथे ३५ वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम कार्ला येथील ३५ वर्षीय महिला काल सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान आपल्या घरात कामकाज करीत असताना घरामध्ये कोणीतरी दगड मारला दगड कोणी मारला हे बघण्यासाठी सदर महिला बाहेर गेली असता गावातील पाच जणांनि जबरदस्ती पीडित महिलेला तोंड दाबून शेजारच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली याबाबत सदर महिलेने आज पहाटे ४ वाजता हिवरखेड पोलीस गाठून फिर्याद दाखल केली. यामध्ये आरोपी संतोष खंडेराव,विलास खंडेराव,नागोराव सपकाळ,शांताराम ससे,त्रिशरण खंडेराव या पाच आरोपी विरुद्ध कलम ३६३,३७६,३७६(ड),३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना हिवरखेड पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक युवराज उईके हे करीत आहेत.सदर प्रकरणात अट्रोसिटी च्या कलमाची वाढ होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिक अप गाडीने दुचाकी स्वार 3 जणांना उडविले , एकाचा मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola