वाडेगांव (डॉ शेख चांद)- भारत डोंगरे यांचे वाडेगाव ग्राम पंचायत कार्यलय समोर दि. २६ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजता पासून इ क्लास जमीनी वरील ग्राम पंचायत सदस्यांनी केलेले अवेंध अतिक्रमण काढणे विषयी आमरण उपोषणाला बसले आहे.
या संदर्भात दि १२ मार्च २०१९ ला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अकोला यांना तसेच मा. ठाणेदार साहेब बाळापूर तसेच इतर संबंधीत विभागात आमरण उपोषण संदर्भात पत्र दिले असून आज रोजी आमरण उपोषणास भारत कैलास डोंगरे यांनी सुरुवात केली. यावेळी शामलाल लोध, दयाराम डोंगरे, राजेश डोंगरे, जगदीश लोध, अॅड सुबोध डोंगरे, राजवर्धन डोंगरे, समीर टेलर, विनोद राहुडकार, बाबुराव फाटकर, वाय एस पठाण सर, मो अफतार, दिनेश धाडसे इत्यादी उपस्थीत होते. बंदोबस्त साठी स्वतः एपीआय वैभव पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थीत होते. आता भारत डोंगरे इ क्लास जमीनी वरील ग्राम पंचायत सदस्यांनी केलेले अवेंध अतिक्रमण काढणे विषयी यांनी केलेले आमरण उपोषणा कडे गावकऱ्यांनचे लक्ष लागले आहे की संबंधीत विभाग काय कार्यवाही करते? ग्राम विकास अधिकारी डी एस अंभोर, भारत कैलास डोंगरे यांनी दिलेल्या आर्जाचा विचार करून संबंधीत विभाग व पोलीस प्रशासनाला पत्र देऊन रितसर कार्यवाही करण्यात येईल.
अधिक वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा नियोजन बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola