तेल्हारा (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी प्रमाणे जयंती दीना निमित्त तेल्हारा शहर व तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शिवसेना व युवासेनेच्या वतीने शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री. लटियाल भवानी प्रतिष्ठाण येथून शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांचे पुजन शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड, शहर प्रमुख विक्रांत शिंदे, तालुका समन्वयक प्रविण वैष्णव, अजय पाटील गावंडे, पप्पूशेठ सोनटक्के, संतोष साबळे, निलेश धनभर, राजेश वानखडे, यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री लटियाल भवानी प्रतिष्ठाण येथून शहरातील मुख्य मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. शहरामध्ये शिवाजी महाराज शोभायात्रेचे ठिकठिकाणी रांगोळी काढुन दिवे लावुन पुष्पवर्षाव करुन शिवाजी महाराजांनी अभिवादन करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी च्या जय जय काराने तेल्हारा नगरी दुमदुमली होती. शोभायाञेचे नेतृत्व ता.प्र विजय पाटील मोहोड, श.प्र.विक्रात शिंदे, ता.स. प्रविण वैष्णव यांनी केले. यावेळी प्रामुख्याने विठ्ठल जोशी, गोपाल विखे, ज्ञानेश्वर आखरे, दिलीप गावडे, सचिव थाटे, मुन्ना पाथ्रीकर, राम वाकोडे, विवेक खारोडे, सुरज देशमुख, प्रज्वल मोहोड, गजानन सोनटक्के, श्याम माहोरे, सुरज काईंगे, पप्पू कामठे, सचिन महल्ले, गोलु सोनटक्के याच्या सह तेल्हारा तालुका व शहर शिवसेना व युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराज वेशभूषेत निलेश तायडे व मावळ्यांच्या वेशभूषेत शुभम सोनोने निलेश पिंजरकर होते.
अधिक वाचा : अकोट शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola