तेल्हारा (प्रतिनिधी) :– कुणबी युवक संघटना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज बिजोस्तव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य टाळमृदुगाच्या गजरात व संत तुकाराम महाराजांच्या व जय भवानी जय शिवरायांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेने तेल्हारा नगरी दुमदुमली. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कुणबी युवक संघटनेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजउत्सवा व शिव जयंती निमित्य विविध कार्यक्रम घेण्यात आले.
22 मार्चला संत तुकाराम महाराज चौका मध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रात्रीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शाळे मध्ये श्री महंत राम भारती महाराज जुना आखाडा यांच्या प्रयोचनाचे आयोजन करण्यात आले होते. 23 मार्चला संत तुकाराम महाराज चौका मधून टाळ मृदुगाच्या गजरात संत तुकाराम महाराज व जय भवानी जय शिवरायांच्या जयघोषात शहराच्या मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील चौका चौका मध्ये शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रे मध्ये अनेक झाकिया सहभागी झाल्या होत्या या मध्ये संत तुकाराम महाराजांची वेशभूषा भांबेरीचे सरपंच मिलिंद भोजने यांनी सादर केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा सुमित भूजबले, मावळ्यांची वेशभूषा विशाल घोडे, सचिन बागलकर व विठ्ठलाची वेशभूषा प्रथमेश खारोडे, रुख्मिणीची वेशभूषा वैष्णवी खारोडे यांनी केली होती. शोभायात्रे मध्ये भांबेरी, वरुळा, निंबोरा, शेरी आदी गावांचे टाळकरी सहभागी झाले होते. भांबेरी, पाथर्डी आदी गावातील कुणबी युवक संघटनेने देखावे सादर केले होते. शोभायात्रे मध्ये महिला पुरुष भाविक भक्त मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. शोभायात्रे नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बीजउत्सवा साजरा करण्याकरिता तालुका व शहर कुणबी युवक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : बेलखेड येथे तुकाराम बीज उत्सव उत्साहात साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola