मंगरुळपीर (प्रतिनिधी) : येथील तहसिलदार वाहुरवाघ यांच्या तक्रारीवरुन दाखल करन्यात आलेल्या खंडणी व अॅट्रासिटीच्या प्रकरणामध्ये मा.ऊच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठाने दि.२२/३/२०१९ रोजी त्यातील आरोपी नंदलाल पवार,फुलचंद भगत व सुरेश सातरोटे यांचे विरुध्द दोषारोप पञ दाखल न करन्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर वृत्त असे की दि.२८/२/२०१९ रोजी मंगरुळपीर येथील तहसिलदार वाहुरवाघ यांनि पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथे त्यांना दि.२५/२/२०१९ रोजीसायंकाळी ४-३० ते५-०० चे दरम्यान नंदलाल पवार,फुलचंद भगत व सुरेश सातरोटे यांनी तहसिल कार्यालय येथे तहसिलदार यांची त्यांनीआयुक्त अमरावती यांचेकडे दिलेली तक्रार तसेच जिल्हाधिकारी वाशिम व लाचलुचपत प्रतिबंधक वाशिम येथे केलेल्या तक्रारी वापस घेन्यासाठी रू.दहा लाखांची खंडणी मागीतली व तहसिलदार यांनी खंडणीचे पैसे न दिल्यास त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनूषंगाने ऊपोषणास बसु व सोशल मिडियावर,फेसबुकवर असे धमकावून खंडणी मागीतली तसेच तहसिलदारांनी त्यांच्या तक्रारीत असे नमूद केले की,तहसिलदार हे अनूसुचित जातींचे असल्यामुळे नंदलाल पवार,फुलचंद भगत व सुरेश सातरोटे हे त्यांना जाणुनबुजुन ञास देतात व समाजात त्यांची बदणामी होन्याच्या दृष्टीने संगनमत करुन धमकी दिली होती अशा आशयाच्या तहसिलदार यांच्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन मंगरुळपीर यांनी दि.२८/२/२०१९ रोजी नंदलाल पवार,फुलचंद भगत व सुरेश सातरोटे यांचे विरुध्द कलम ३८४,४९९,५०१/बी भांदवी कलम आणी कलम ३(१) (क्यु)(आर) अनुसुचित जाती आणी अनूसुचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम१९८९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
नंदलाल पवार,फुलचंद भगत व सुरेश सातरोटे या तिघांनी सदरहू गुन्हा रद्द करणेसाठी मा.ऊच्च न्यायालय,नागपुर खंडपिठ येथे अधिवक्ता अमित व्हि बंड यांचेमार्फत फौजदारी अर्ज दाखल केला.सदरहू अर्जाची सुनावणी दि.२२/३/२०१९ रोजी मा.ऊच्च न्यायालय नागपुर खंडपिठ येथील माननिय न्यायमुर्ती झेड ए.हक व माननिय न्यायमुती विनय जोशी यांच्या खंडपिठापुढे झाली.सुनावनी नंतर माननिय न्यायालयाने तक्रारदार तहसिलदार वाहुरवाघ व पोलिस स्टेशन मंगरुळपीर यांना नोटीस काढली तसेच पोलिस स्टेशन मंगरुळपीर यांना तहसिलदार यांच्या दाखल केलेल्या तक्रारीवरुन नोंदविलेल्या गुन्ह्यात दोषारोप पञ दाखल न करन्याचे आदेश पारित केले.
सदरहु केसमध्ये नंदलाल पवार,फुलचंद भगत व सुरेश सातरोटे तिन्ही अर्जदार यांचेवतीने मा.ऊच्च न्यायालयाचे अधिवक्ता अॅड.अमित व्ही.बंड यांनी कामकाज पाहिले.
अधिक वाचा : विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बाहकर यांची पहिली धडाकेबाज कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola