बाळापूर (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणूक व आचार संहिता लक्षात घेऊन, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन बाळापूर हद्दी मध्ये अवैध दारू व जुगार ह्या वर नियंत्रण मिळविण्या साठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली हे पथक दररोज पोलीस स्टेशन क्षेत्रात धाड मारून कारवाया करीत आहे.त्यामुळे बाळापूर पोलीस जोमात तर अवैध धंदे वाले कोमात असे बोलल्या जात आहे.
मागील 3 दिवसात ह्या पथकाने खात्री लायक माहिती वरून लाखनवडा शिवारात तास पत्त्यावर जुगार खेळणाऱ्या एकूण 5 इसमावर कारवाई केली त्या पैकी संदीप वामन गुड दे, दीपक रामभाऊ गुडदे, पंडित भिकाजी इंगोले ह्यांना जागेवरच पकडले व युवराज उदयभान इंगोले व रतन गुडदे हे फरार झाले त्यांचे कडून नगदी 490 रुपये, एक मिक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 रुपये, एक मोटारसायकल पॅशन प्रो कंपनीची किंमत अंदाजे 40,000 रुपये असा एकूण 50,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच लाखनवडा येथेच वरळी मटक्यावर जुगार घेणारा विलास सूर्यभान सिरसाट ह्याला ताब्यात घेऊन त्याचे कडून नगदी 515 व साहित्य जप्त करण्यात आले तसेच दिनांक 19।3।19 रोजी खात्रीलायक माहिती वरून पारस फाटा येथे नाकाबंदी करून मोटार सायकल वरून अवैध रित्या गोमांस कत्तल करून वाहून नेणाऱ्या शेख फारुख शेख नजीर राहणार पारस, ह्याला ताब्यात घेऊन त्याचे कडून 50 किलो गोवंश मास व मोटारसायकल किंमत 52,500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी 23।3।19 पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली, तसेच आज दिनांक 20।3।19 रोजी माहिती मिळाल्या वरून अकोला नाका येथे नाकाबंदी करून अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणारे , देवानंद भीमराव बावणे, व मंगेश निरंजन सुरुशे दोघे राहणार मनारखेड ह्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून 18 देशी दारू क्वार्टर किंमत 936 रुपये व स्टार सिटी मोटारसायकल किंमत 25,000 रुपये असा एकूण 25, 936 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
3 दिवसात अवैध दारू, जुगार, गोवंश वर धाडी घालून एकूण 1,29,621 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, राठोड, हर्षल श्रीवास, कायंदे ह्यांनी केली.
अधिक वाचा : विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बाहकर यांची पहिली धडाकेबाज कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola