अकोला(प्रतिनिधी)– दिनांक 19 मार्च 2019 रोजी सेवा विषयक बाबीसाठी कर्मचारी व लोकांनी केलेल्या वैयक्तिक तक्रारी बद्दल जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुष प्रसाद सर यांचे दालनात समक्ष सुनावणी घेण्यात आली.या अनुषंगाने संबंधित तक्रारदार व संबंधित विभाग यांची सुनावणी घेऊन प्रकरनाचा निपटारा करण्यात आला व लोकांचे म्हणणे समजून घेऊन त्यांचे समाधान करण्यात आले. यावेळी सामान्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांचे कडे एकुण 85 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तसेच वेळेवर विविध विभागा कडून 15 प्रकरणे व बांधकाम विभाग कडून 13 प्रकरणे असे एकूण 113 तक्रारी प्राप्त झाले होत्या. त्यापैकी 37 तक्रारदार हे गैहजर होते. तर 76 तक्रारीचा निपटारा करून त्यांचे समाधान करून या सर्व प्रकरना संदर्भात पुढील कार्यवाही सुरु करण्याबाबतचे निर्देश संबंधिताना देण्यात आले आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे. यावेळी तक्रारदार व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अद्यावत माहिती सह उपस्थित होते.
अधिक वाचा : आजपासून लोकसभेच्या उमेदवारी अर्जास सुरवात -जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola