हिवरखेड(प्रतिनिधी)- अकोल्यातील हिवरखेड परिसरात कत्तली करिता गौवंशाची वाहतूक करणाऱ्या अठरा पिकअप वाहनांना अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं पड़कले आहे. या दरम्यान अंदाजे ९० ते १०० गौवंशाची सुटका करण्यात आली असून आणखी गौवंश वाढण्याची शक्यता जात आहे. या प्रकरणी वाहन चालकासह काही जणांना ताब्यात घेतले तर काही जण घटना स्थळावरून पसार झाले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममता वादे पोलीस कर्मचारी अब्दुल माजिद, शेख हसन, इजाज अहमद, रवी इरचे, संदीप कटाकर, भाऊलाल हेबार्डे, मनोज नागमते, अभय बावस्कर, ढोरे यांनी केली आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दित ही कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोलल्या जात आहे.
अधिक वाचा : अट्टल चोरट्यास अटक, अकोट शहर पोलिसांची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola