वाडेगाव(डॉ शेख चांद)- वाडेगांव जिल्हा परीषद शाळा ( मुले ) ही अकोला जिल्हयातील पहीली व विभागातील तिसरी आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त वाडेगांवची शाळा ठरली आहे.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्नतेसाठी जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळांचे बाह्यामुल्यांकन केले. या मुल्यांकनात वाडेगांव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेने बाजी मारली. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून संलग्नता देण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिल्याचे पत्र मुख्याद्यापक समाधान सोर यांना प्राप्त झाले. डिजिटल शाळेसोबत वैविध्यपुर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळांना आंतराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतीक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षीत शिक्षक मिळावे, या दुष्टीकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मडळाची स्थापना केली. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देन्यासाठी मंडळाने ऑनलाईन अर्ज मांगतले होते. यात जिल्ह्यातील पाच शाळांची मंडळाने निवड केली. या पाच शाळांच्या बाह्यामुल्यांकनासाठी राज्यस्तरीय शाळा मुल्यांकन समीतीच्या सहा सदस्यीय चमूने ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पाच शाळांची तपासनी केली. तपासणीमध्ये वाडेगांव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेने आंतरराष्ट्रीय शाळा संलग्नतेसाठी आवश्यक असलेले सर्व निकष पुर्ण केल्यामुळे या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मिडळाने आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्रधान केला असून सर्वत्र मुख्याद्यापक समाधान सोर सर, जि प सदस्य हिम्मतराव घोटाळ, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष डॉ शेख चांद, अनिता बी शेख फिरोज उपसभापती, प्रशांत मानकर पं स सदस्य , आर पवार केंद्र प्रमुख, ज्ञानेश्वर पुंडकर, माझी मुख्याद्यापक एम टी मानकर सर, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समीती चे सदस्य शिक्षक, शिक्षीका, यांच्या सह ग्रामस्थांचे अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्या मुळे आता ग्रामीण भागातील मुला मुलींना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे.
यासाठी शाळेला आंतरराष्ट्रीय मंडळाची संलग्नता मिळवण्यासाठी मुख्याद्यापक समाधान सोर सर, डॉ. प्रकाश जाधव सर प्राचार्य जिल्हा शैक्षणीक सातत्यपुर्ण व्यवसायीक विकाश संस्था, वैशाली ठग शिक्षण अधिकारी अकोला, जि प सदस्य हिम्मतराव घोटाळ, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष डॉ शेख चांद, श्री ओंकार गाठेकर वि.अ. वर्ग १, अनिता बी शेख फिरोज उपसभापती, प्रशांत मानकर पं स सदस्य, गौतम बडवे ग. शि. अ., श्री अजय बांडी ग . अ. शि., डी आर पवार केंद्र प्रमुख, ज्ञानेश्वर पुंडकर, माझी मुख्याद्यापक एम टी मानकर सर, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समीती चे सदस्य शिक्षक, शिक्षीका, यांच्या सह ग्रामस्थांचे मोठे सहकार्या मिळाले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola