हिवरखेड (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील सरस्वती विद्या मंदिर येथील एका वर्गखोलीत रानटी डुक्कर घुसल्याने एकच खळबळ शाळेत माजली आहे. यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानटी डुक्करला पकडन्यासाठी जाळे टाकले असून डुकराला पकडन्याचे काम सुरू आहे.
हिवरखेड येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या दुसऱ्या वर्गाच्या खोलीत आज सकाळी अचानक रानटी डुकराने शिरकाव केला.यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी अचानक रानटी डुक्कर शाळेमध्ये घुसल्याने भयबीत झाले होते. मात्र शिक्षकांनी यावेळी समयसूचकता दाखवत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून डुकराला ऐका एका वर्गखोलीत बंद करून वन विभागाला याची माहिती दिली यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनि रान डुकराला पकडण्यासाठी जाळे टाकले असून ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. रान डुक्कर शाळेत घुसल्याची बातमी हिवरखेडात पसरताच बघ्याची गर्दी जमली आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola