बाळापूर(प्रतिनिधी)- बाळापूर शहरातील स्टेट बँक रोड भागात असलेल्या नवकार ज्वेलर्स मधून 25,000 रुपये किमतीचे दागिने सोनाराची नजर चुकवून लंपास करणाऱ्या सोनटक्के प्लॉट अकोला येथे राहणाऱ्या एका अट्टल चोरटीला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन तिचे कडून चोरलेले 25,000 रुपये किमतीचे 25 बेसर जप्त करून 1 तासात चोरी उघडकीस आणली. सदर गुन्ह्याची हकीकत अशी की बाळापूर शहरातील SBI रोड वर विराग शिरीष कुमार शाह ह्यांचे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचे दुकान असून आज 10.30 वाजता ते दुकानात असतांना एक मुस्लिम स्त्री बुरखा घालून आली व तिने सोन्याचे बेसर मागितले, सोनाराने तिला 25 सोन्याचे बेसर असलेली स्ट्रीप दिली असता तिने आणखी पाहण्यास मागितले. सोनार दागिने काढीत असतांना त्या स्त्रीने बेसर घेऊन पोबारा केला, सोनाराच्या ही बाब लक्षात येताच त्याने बेसर शोधले ते दिसून आले नाही, त्याने ही बाब त्वरित बाळापूर पोलिसांना कळवली, पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्वरित पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, हर्षल श्रीवास, जयवंत शिंदे, गिरीश वीर महिला कर्मचारी मंगला काकण ह्यांना चोरटीचे शोधात पाठविले.
नागरिकांच्या मदतीने व सोनाराने सांगितलेल्या वर्णनावरून दोन्ही हाताला कोड असलेल्या मुस्लिम बुरखाधारी स्त्रीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून सोनाराला दाखवून खात्री करून महिला कर्मचाऱ्या कडून झडती घेतली असता चोरलेले बेसर मिळून आल्या वरून तिचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर च्या चोरटी ची पोलीस कोठडीची मागणी करून अधिक तपास करण्यात येणार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी करीत आहेत.
अधिक वाचा : तेल्हाऱ्यात रंगलेल्या क्रिकेट सट्यावर एल. सी. बी. चा छापा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola