अकोला (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी बँकांमध्ये जमा करण्यात आलेली मदतीची रक्कम तीन दिवसांत शेतकºयांच्या खात्यात जमा करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील बँक अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कायालयार्फत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान संबंधित तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आली; मात्र मदतीची रक्कम वितरित करण्यात आली असली तरी, दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. अशा आशयाचे वृत्त ९ मार्च रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवार, ११ मार्च रोजी जिल्ह्यातील बँक अधिकाºयांची बैठक घेतली. दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी बँकांमध्ये जमा करण्यात आलेली सर्व मदतीची रक्कम तीन दिवसांत संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचा अल्टीमेटम जिल्हाधिकाºयांनी बँकांना दिला. मदतीची रक्कम तीन दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी बँक अधिकाºयांच्या बैठकीत दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे जिल्हा समन्वयक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी ५६ कोटी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola