वर्ल्डवाईड वेब (World Wide Web )च्या 30 व्या वर्षपूर्तीनिमित्त गुगलने खास डुडल साकारले आहे. जगभरातील माहिती एकत्र मिळण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रतिक डुडलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
वर्ल्ड वाईड वेब (WWW) याला साधारणपणे वेब असे म्हटले जाते. यातून तुम्ही हायपरटेक्स्ट माहिती इंटरनेट द्वारा प्राप्त करु शकता. एका वेब ब्राऊजरच्या साहाय्याने तुम्ही माहिती टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ आणि अन्य मल्टीमीडिया स्वरुपात पाहु शकता. हायपरलिंक व्दारा हे पेजेस जोडलेले असतात.
इंग्लिश शास्त्रज्ञ टिम बर्नर्स-ली (Berners-Lee) यांनी वर्ल्ड वाईड वेब (WWW) चा शोध 12 मार्च 1989 साली लावला. मात्र हा शोध जगात क्रांती घडवेल याची, कल्पनाही त्याला नव्हती. WWW च्या आधुनिक तंत्रज्ञानाला यश मिळण्यासाठी तब्बल 2 वर्ष लागली. संपूर्ण जगासाठी हे 1991 साली खुले झाले. जगाला इंटरनेटचे गिफ्ट देणारे टिम बर्नर ली यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या वेब क्षेत्राकडील त्यांची ओढ वाढत गेली. क्विंज कॉलेज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर 1976 साली त्यांनी फिजिक्समध्ये पदवी संपादन केली. त्यांना गणिताचे देखील चांगले ज्ञान होते. त्यांना यात आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले. 1990 मध्ये स्वित्झर्लंडच्या जिनेवाजवळ सीईआरएनमध्ये नोकरी करताना त्याने प्रथम वेब ब्राउझरचा शोध लावला.
वर्ल्ड वाईडव वेब (WWW) हे इंटरनेटवरील सर्व स्रोतांचा आणि वापरकर्त्यांचा एक संयोजन आहे, ज्यामध्ये हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (HTTP) वापरला जातो. वर्ल्ड वाईड वेब कंसोर्टियम (W3C) ने याची चांगली व्याख्या केली आहे. वर्ल्ड वाईड वेब नेटवर्क सर्व माहितीचे ब्रह्मांड आहे आणि हे एक मानव ज्ञानाचा अवतार आहे.
अधिक वाचा : Olga Ladyzhenskaya यांच्या 97 व्या जन्मदिनी Google Doodle कडून आदरांजली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1