अकोला (प्रतिनिधी) – अकोट तालुक्यातील शहापूर परिसरात आज दुपारच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.
शहापूर परिसरातील ई-क्लास जमिनीवर मृत व कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाघाचा मुत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी अकोट तालुक्यातील चोरवड या गावातील केळी उत्पादक शेतकरी गजानन पराये यांच्या शेतात दोन पट्टेदार वाघ आढळून आले होते. त्यानंतर आज एका वाघाचा मृतदेह मृत आढळून आला. हा वाघ त्या दोन वाघांपैकीच असावा असा अंदाजही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : देवरी फाटा येथे सर्प मीत्राने दीले कोबरा या जातीच्या सापाला जीवदान.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola