अकोला (प्रतिनिधी) : बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालय इमारतीचे भूमिपूजन आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रदीप न. देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे तर अध्यक्ष म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यनशिवराज गो. खोब्रागडे तसेच बार्शिटाकळी येथील दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) परेश रा. वागडोळे आणि वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आशीक अली शाह हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदींसह न्यायधीश, वकिल, नागरिक उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात न्यायमूर्ती श्री. देशमुख म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी कायदयाचा सदुपयोग झाला पाहिजे. तसेच न्यायादानाची प्रक्रीया जास्त काळ लांबू न देता वेळेत न्यायनिवाडा होण्यावर भर दिला जावा. पूर्वीपेक्षा आता न्यायालयांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील नागरिकांसाठी न्यायालयाची नवीन इमारत लवकरात लवकर पूर्ण करुन देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, बार्शिटाकळी हे शहर अकोल्याचे नवीन उपनगर म्हणून झपाटयाने पुढे येत आहे. या तालुक्यातील नागरिकांसाठी न्यायालयाची नवीन अशी इमारत एक वर्षाच्या आत पूर्ण केली जाईल. विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आपणाकडे असल्यामुळे या विभागाच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. वकिलांच्या सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले. यापुढेही या विभागाच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.
यावेळी न्यायाधीश यनशिवराज गो. खोब्रागडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ॲड. आशीक अली शाह यांनी केले. न्यायधीश परेश रा. वागडोळे यांनी आभार मानले.
अधिक वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचा दि. 3 मार्च रोजी भूमिपूजन सोहळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola