अकोला (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीमध्ये समाविष्ट झालेल्या अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे बंधु तथा इंदु मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थी अकोला जिल्हा अध्यक्ष पदि संकेत विजय दुर्याधन यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती आज स्थानिक जिल्हा परिषद विश्राम गृह अकोला येथे करण्यात आली. पक्ष प्रमुख आनंदराज आंबेडकर आदेशावरून प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे मार्गदर्शनाखाली विदर्भ अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी हि नियुक्ती केली. जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थींच्या प्रश्न सोडवून येत्या आगामी निवडणुकीत युवा वर्गाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करून बाळासाहेबांचे हात मजबुत करण्यासाठी मोठी मदत करण्यासाठी ह्या नियुक्ती करण्यात आल्याचे विदर्भ अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी यावेळी सांगितले आहे.
या नियुक्ती बद्दल रिपब्लिकन विद्यार्थी सेना मराठवाडा संपर्क प्रमुख सचिन निमक मुंबई अध्यक्ष आशिष गाडे, विशाल मोरे यांच्या सह सुयोग ईंगोले, अॅड.आकाश भगत, अक्षय नागमोते, प्रजवल धांडे, रोषन तायडे, सोनु गवई यांनी अभिनंदन केले.
अधिक वाचा : लोकजागर मंचच्या तेल्हारा शहर अध्यक्ष पदी राजेश काटे यांची नियुक्ती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola