अकोला (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली गृह (शहरे) राज्यमंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. 3 मार्च 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता निमवाडी, पोलीस मुख्यालयाजवळ, अकोला येथे होणार आहे.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, राज्य सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरीया, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, बळीराम सिरस्कार, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, महानगर पालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अकोला यांच्या कार्यालयासह सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, चर्मोद्योग विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती महामंडळ तसेच मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अंध अपंग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय कार्यालये राहणार आहेत.
तसेच सांस्कृतिक सभागृह, अभ्यासिका, वाचनालय, माहिती केंद्र, संगणक सुविधा केंद्र, संग्राहालय, कलादालन, बैठक हॉल, कॉन्फरन्स हॉल, उपहारगृह आदी सर्व सुविधांनी युक्त सामाजिक न्याय भवन निर्माण होणार आहे. या इमारतीच्या भुमिपूजन सोहळा कार्यक्रमास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.
अधिक वाचा : लोकजागर मंचातर्फे शिवजयंतीच्या पर्वावर बालशिवाजी वेशभूषा स्पर्धा,शिव अभिवादन सोहळा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola