पातूर : (सुनिल गाडगे )-येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे जागतिक मराठी दिनाचे औचित्त साधून पहिलं बाल साहित्य संमेलन थाटात पार पडले. या संमेलनाचे वैशिट्य म्हणजे विद्यार्थ्यानीच या सम्पूर्ण संमेलनाची तयारी केली होती. विविध साहित्याची दालने या संमेलनाची आकर्षण ठरले होते.
या संमेलनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले होते तर पुलवामा हल्ल्यात शाहिद झालेले शाहिद नितीन राठोड विचारमंच व शाहिद संजय राजपूत दालन अशी नावे देऊन त्यांना हे संमेलन समर्पित करण्यात आले.
दरम्यान या बाल साहित्य संमेलनला अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास निर्मिती मंडळाच्या सदस्या डॉ. ममताताई इंगोले यांनी भेट देऊन या संमेलनाचे कोतुक केले.या संमेलनाच्या अध्यक्षस्थान ख़ुशी राठोड या विद्यार्थीनीने भूषवले. तर राहुल अंधारे याचे हस्ते संमेलनाचे उदघाट्न पार पडले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून क्षितिज सोनोने याची उपस्थिती होती.
या उदघाट्न सत्राचे संचालन कृतिका बोबडे व शृष्टी उगले यांनी केले. यानंतर मोबाईल चे दुषपरिणाम व विदयार्थी कसा असावा या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादाचे अध्यक्ष पार्थ अरविंद वानखडे तर प्रमुख वक्ते म्हणून सुजल सुगन्धी, प्रेम मानकर, खुशी राठोड, हर्षल ठाकरे, तन्मय उगले, राहुल अंधारे आदी विदयार्थ्यानी विचार व्यक्त केले. संचालन कल्याणी शिंदे, तर आभार दीपाली अवचार या विद्यर्थिनीने मानले. यानंतर कविसंमेलन पार पडले. यामध्ये राहुल अंधारे, स्नेहल बागडे, ओम निखाडे, मयुरी राठोड, रोहित तेलगोटे, प्रेरणा राठोड, वैष्णवी पेंढारकर, दिपाली अवचार आदी विद्यार्थ्यानी कविता सादर केल्या. संचालन गायत्री पेंढारकर हिने केले. कवीसंमेलनानंतर गोपाल गाडगे यांची मुलाखत कृतिका बोबडे, प्रियानी पवार, रीना बगाडे, खुशी राठोड आदी विद्यार्थ्यानी घेतली.
या संमेलनात कुणाल उंद्रे, क्षितिज सोनोने यांनी अखिल भारतीय साहित्य संमलेनाचा माहितीपट,
निरज पवार , चेतन ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार माहिती संकलन,समृद्धी वानखडे, क्रिष्टी चिकटे यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त मराठी लेखकांची माहिती,
दर्शन तायडे याने मराठी साहीत्य प्रकारांची माहिती,
प्रज्वल शिंदे याने मराठी लेखकांची माहिती दिली. तर दालन सजावट कल्याणी शिंदे, दिपाली अवचार, खुशी राठोड, कोमल अमानकर, रिना बगाडे, मनप्रीत कौर, कृतिका बोबडे,प्रियाणी पवार, दिपीका चव्हाण यांनी केली.या संमेलनात मराठी विषयात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. तर सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धेत विजयी प्रेरणा राठोड हिला गौरविण्यात आले.