बाळापूर (प्रतिनिधी) : बाळापूर पोलिसांनी वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या धान्य व गोठ्यातील जनावरे चोरून विकणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते व त्यांचे कडून 2 गुन्हे उघड करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दिनांक 5।11।18 रोजी नांदखेड टाकळी येथील सचिन नामदेवराव कवळकर ह्यांनी पोलिस स्टेशन बाळापूर येथे फिर्याद दिली होती की नांदखेड टाकळी येथील त्यांचे मालकीच्या शेत शिवार मधून कोणीतरी अज्ञात चोराने 8 कट्टे उडीद किंमत 20,000 रुपयाचं धान्य चोरून नेल्या वरून पोलिस स्टेशन बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस कस्टडी मध्ये असलेल्या धान्य चोरांच्या टोळी पैकी दीपक हरिहर लोखंडे, ज्ञानेश्वर रामदास चिंचोळकर, अर्जुन विष्णू मसने ह्यांनी नांदखेड शिवारातून उडीदाचे 8 कट्टे चोरून वाशिम येथील व्यापाऱ्याला विकल्याची कबुली दिल्यावरून उप विभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल केशव दाभाडे, कॉन्स्टेबल अमर पवार ह्यांनी वाशिम येथील व्यापाऱ्या कडून चोरीचे 8 कट्टे उडीद जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेली पिकअप वाहन क्रमांक MH 30 BD 1132 हे वाहन सुद्धा ताब्यात घेतले. सदर चोरांनी पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये सुद्धा शेतातील धान्यांची चोरी केल्याची कबुली दिल्यावरून त्यांना पुढील तपासा करीत विद्यमान न्यायालयाचे आदेशाने पातूर पोलीस ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola