नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या घडामोडींवर प्रकाश टाकला. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय हवाई दलाने त्या सर्वच विमानांना पळवून लावले. पळून जाणाऱ्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांपैकी एक F-16 हाणून पाडण्यात यश आले आहे. परंतु, या संपूर्ण कारवाईदरम्यान भारताचे एक मिग-21 विमान बेपत्ता झाले आहे. या विमानातील वैमानिकाशी सुद्धा अद्याप संवाद झालेला नाही. पाकिस्तानने तो आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला.
फायटर पायलट सुखरूप परत करा
भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे लढाऊ विमान भारताच्या हद्दीत घुसत असताना त्यांना भारताच्या लढाऊ विमानांनी पळवून लावले. यात भारतात पाकिस्तानचे एक विमान पाडले. तसेच भारताचे एक मिग-21 विमान अजुनही बेपत्ता आहे. ते विमान आणि त्यातील वैमानिक अभिनंदन बेपत्ता असणे आणि तो पाकिस्तानच्याच ताब्यात असल्याचा दावा मान्य केला. सोबतच, पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याचे पुरावे सुपूर्द करून त्या वैमानिकाच्या सुखरूप सुटकेचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पाकिस्तानी आर्मीने जारी केला व्हिडिओ
याच दरम्यान भारताला आपला दावा पटवून देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने एक व्हिडिओ क्लिप जारी केली आहे. 46 सेकंदांच्या या क्लिपमध्ये असलेली व्यक्ती स्वतःला विंग कमांडर अभिनंदन असे म्हणतो. त्याने सांगितल्याप्रमाणे, “मी भारतीय हवाई दलाचा एक अधिकारी असून माझे सर्व्हिस क्रमांक 27981 असे आहे.”
अधिक वाचा : पुलवामाचे उत्तर : भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर केला 1000 किलो बॉम्बचा हल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola