दानापूर (प्रतिनिधी) – दानापुर ग्रामपंचायतचे सरपंच अंजली श्रीकृष्ण नाठे यांना विभागीय आयुक्त यांनी अखेर अपात्र घोषित केले आहे. महाराष्ट्र शासन प्लॉट क्रमांक 846 ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 53 या जागेवर सरपंच नाठे यांनी अतिक्रमण करून रहात असल्याबाबतचे तक्रार प्रेम कुमार गोयनका यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली होती तक्रारीनुसार जिल्हाधिकारी यांनी 27 डिसेंबर 2018 रोजी अंजली नाठे यांना सरपंच व सदस्यपदावरून अपात्र घोषित केले होते जिल्हाधिकारी यांच्या निकालाविरोधात अंजली नाठे यांनी विभाग विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल करून स्थगिती मिळवली होती. या स्थगितीला आव्हान देत गोयनका यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून या प्रकरणात न्याय मागितला होता. न्यायालयाने 25 फेब्रुवारी पर्यंत सदर प्रकरण निकाली काढण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांना दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी चौकशी करून दि.22 फेब्रुवारी ला जिल्हाधिकारी यांना त्यांचा आदेश कायम ठेवत अपात्र करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयामुळे 26 फेब्रुवारी रोजी मासिक सभा उपसरपंच महादेव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणात गोयनका यांच्या बाजूने वकील वैष्णव व वकील सावाई यांनी बाजू मांडली सरपंच यांच्या अपात्र झाल्यामुळे दानापूर येथे एकच खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : दानापुर येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola