अकोला (प्रतिनिधी) – दुष्काळी मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत आणखी ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला असून, मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी पहिल्या हप्त्यात ३१ जानेवारी रोजी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपये आणि दुसºया हप्त्यात १५ फेबु्रवारी रोजी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदतीची रक्कम तहसील कार्यालयांमार्फत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मदत वाटपाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी शासनामार्फत ५६ कोटी ५ लाख ७० हजार रुपयांचा मदतनिधी २५ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २६ फेबु्रवारी रोजी दिला. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृती!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola