पातूर (सुनिल गाडगे)- दरवर्षी प्रमाणे यंदाही विदर्भांचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज प्रगटदिना निमित्य जोगलखेड फाटा येथे अकोला ते शेगाव पायी जाणाऱ्या गजानन भक्तांना मोफत औषध उपचार तसेच मोफत औषध गोळ्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला डॉ.सचिन बोंबटकर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास उपस्थिती म्हणून माऊली मिञ मंडळाचे कार्यकर्ते प्रभुदास बोंबटकर विनोद फुलारी सुनिल गाडगे चंदू इंगळे वैभव तायडेशाम हरणे तायडे सोनू भाऊ हरणे भगवान पाटील गोलू गाडगे यांनी अथक परिश्रम घेतले.