अकोला (प्रतिनिधी) – कधी पावसाअभावी तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पीक हातचे जाते. त्याचप्रमाणे पक्षी व वन्य प्राण्यांमुळेही शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. नैसर्गिक आपत्तीपेक्षा जनावरांच्या नुकसानीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसते. यापासून बचावासाठी एका शेतकऱ्याने ‘शेतकरी घंटा’ या यंत्राची अभिनव निर्मिती केली आहे.
पेरणीनंतर शेतामध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढतो. हरिण, रानडुक्कर, माकड आणि नील गाईच्या संचारामुळे शेतातील पीक फस्त होते. या प्राण्यांना हाकलण्यासाठी शेतकऱ्यांकडून नानाविधी उपक्रम राबविले जातात. त्यातील काही प्रयोग खर्चिक असतात. शेतकऱ्यांची ही खरी व्यथा एका शेतकऱ्याने ओळखून त्यांनी एका नवीन यंत्राची निर्मिती केली आहे. हवेच्या वेगावर फिरणारा पंख्याच्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातील असा यंत्र त्यांनी तयार केला आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील आळंद गावातील गजानन निलखन या शेतकऱ्याने टिकाऊ आणि स्वस्त असे ‘शेतकरी घंटा’ हे यंत्र तयार केले आहे. शेतात लोखंडी पाइपच्या आधारावर हे यंत्र उभे करण्यात आले असून या यंत्राला चालविण्यासाठी वीज, पेट्रोल, डिझेल किंवा रॉकेलची गरज नाही. केवळ हवेद्वारे ३६० डिग्रीच्या दिशेने हे यंत्र फिरत असते. या यंत्रामधून येणाऱ्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातात. त्यामुळे या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा भरपूर फायदा झाला असून ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.
असे आहे यंत्र
प्लास्टिकच्या पंखाला सायकलच्या चाकातील बेरिंगवर बसवून त्यामागे लोखंडी पाईप लावण्यात आला आहे. त्याला आडवी लोखंडी पट्टी लावून त्यावर खाली लावलेल्या ताटावर ही पट्टी फिरते. त्यातून निघणाऱ्या जोरकस आणि कर्कश आवाजामुळे वन्यप्राणी पळून जातात.
आधी असे करायचे शेतकरी प्रयोग
वन्य प्राण्यांना हाकलून लावण्यासाठी पूर्वी शेतकरी टाळ्या वाजवीत असत. त्यानंतर रात्रभर ओरडत होते. यावर तिसरा उपाय म्हणून डफडे वाजविणे, फटाके फोडण्यासारखे उपाय केले. परंतु, ‘शेतकरी घंटा’ हे यंत्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे श्रम न देता वन्यप्राण्यांना पळवून लावतात. त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून त्याची राज्यभरात मागणी आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola