अकोला (प्रतिनिधी) – संत गजानन महाराज यांचा सोमवारी प्रगट दिन आहे. त्यासाठी गजानन महाराजांचा जयघोष करीत अकोल्यातील हजारो भाविक पायी वारीने रविवारी संध्याकाळी शेगावकडे रवाना झाले. वारकऱ्यांसाठी प्रवासादरम्यान ठिकठिकाणी चहा-नाश्त्याची व्यवस्था नागरिकांनी केली आहे.
गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अकोल्यातील हजारो भाविक या उत्सवासाठी शेगाव येथे एक दिवस आधीपासूनच जातात. काही भाविक हे प्रगट दिनाच्या दिवशी पहाटेच गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी रांग लावतात. यामुळे शेगावला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या रस्त्यावर काही नागरिक तथा सामाजिक संस्था वारकऱ्यांसाठी चहा-नाश्ता, तसेच पाण्याचीही व्यवस्था करतात. अनेक ठिकाणी तर वारकऱ्यांसाठी औषधांची व्यवस्था करण्यात येते.
प्रगट दिनाच्या सात दिवस आधी जिल्हाभर अनेक गावांमध्ये भागवत सप्ताह आयोजित करण्यात येतो. प्रगट दिनाच्या दिवशी या सप्ताहाचा समारोप करून काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. ठिकठिकाणी होणाऱ्या या महाप्रसादाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण होते. शासकीय कार्यालयांना त्या दिवशी जणूकाही सुटीचा अनुभव येतो. अनेक भाविक हे वाहनाने तथा एसटी बसने शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जातात.
अधिक वाचा : श्री गजानन भक्त मंडळातर्फे आरसुळ फाटा येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन,हजारो भाविकांनी घेतला लाभ
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola