खामगाव (प्रतिनिधी) – दहावीच्या परीक्षेच्या ताणामुळे तीन विद्यार्थिनींनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात दोघींचा मृत्यू झाला असून एकीवर अकोला येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. नयना सदाशिव शिंदे (16), निकिता अनिल रोहणकार (15), रुपाली किशोर उनवणे (15) अशी या तिघींची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी की, नयना, निकिता आणि रुपाली या तिघींची येत्या 1 मार्चपासून दहावीची परीक्षा आहे. शुक्रवारी (ता.22) प्रात्याक्षिक परीक्षा दिल्यानंतर तिघींनी परीक्षेचा ताण घेतला. तिघींनी मुक्तेश्वर आश्रमाजवळ उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. नंतर नॅशनल शाळेजवळ पाणीपुरी खाल्ली. नंतर घरी गेल्या. दरम्यान नयना, निकिता आणि रुपालीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. खामगाव येथे उपचार सुरु असताना शनिवार विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना अकोला येथे आणण्यात आले. अकोला येथे उपचार सुरु असताना नयना शिंदे हिचा शनिवारी रात्री तर निकिताचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.
दरम्यान, रुपाली किशोर उनवणे हिची प्रकृती अत्यवस्थ आहे. या घटनेनंतर पाणीपुरी खाऊन मुलींचा मृत्यू झाल्याची अफवा खामगाव शहरात पसरली.
अधिक वाचा : कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया बेतली महिलेच्या जीवावर!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola