आरसुळ(प्रतिनिधी)– गजानन भक्त मंडळ यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आरसूळ फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भव्य प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन गेल्या पाच दिवसांपासून रात्रंदिवस महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे दिनांक 21 फेब्रुवारीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती आरसुळ येथे भव्य अश्या महाप्रसादाचे आयोजन श्री गजानन भक्त मंडळ याच्यामार्फत करण्यात आले असून याठिकाणी अमरावती अकोला जिल्हा मधून येणारा दिंड्या ,पालख्या, संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगाव येथे पायी जाणाऱ्या भक्तांकरिता जेवणाची व निवासाची मोफत व्यवस्था दरवर्षी करण्यात येते याकरिता तालुक्यातील श्री गजानन भक्त मंडळ गेल्या आठ दिवसापासून रात्रंदिवस अथक परिश्रम करीत आहेत यामध्ये महिला मंडळाचा समावेश असून वनी वरोरा या मार्गावर विविध ठिकाणी निशुल्क चहापाणी फराळ महाप्रसाद मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी आयोजन केले आह.