अकोला(प्रतिनिधी)– महसूल विभागाच्या आदेशानुसार २० फेबु्रवारी महसूल विभागातील अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ११ महसूल अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, अकोल्याचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) म्हणून अमरावतीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राम लठाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ११ महसूल अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांची बदली करण्यात आली; मात्र त्यांच्या पदस्थापनेचे ठिकाण अद्याप निश्चित नाही. त्यांच्या जागी बाळापूरचे नवे उपविभागीय अधिकारी म्हणून यवतमाळचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोटचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांची अमरावती येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अकोटचे उपविभागीय अधिकारी म्हणून अमरावती येथील उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अनिल खंडागळे यांची वाशिम येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अमरावतीचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप महाजन येत आहेत. रोहयो उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) म्हणून बदली करण्यात आली आहे. बाळापूरचे तहसीलदार डी. पी. पुंडे यांची यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अंजनगावचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी येत आहेत. पातूरचे तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांची पुसद येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी देऊळगाव राजाचे तहसीलदार डी.आर. बाजड यांची नियुक्ती करण्यात आली. मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांची नांदुरा येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी चिखलदराचे तहसीलदार प्रदीप पवार येत आहेत. नझूल अधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (महसूल) म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार मनोज लोणारकर नझूल तहसीलदार म्हणून येत आहेत. अकोटचे तहसीलदार व्ही.व्ही. घुगे यांची अंजनगाव येथे तहसीलदारपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी दिग्रसचे तहसीलदार किशोर बागडे येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील खरेदी अधिकारी पूजा माटोडे यांची घाटंजी येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. बार्शीटाकळीचे तहसीलदार आर.ए. काळे यांची यवतमाळ येथे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.
अधिक वाचा : ९ व १० फेब्रुवारी रोजी नागपुरात म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola