अकोला (प्रतिनिधी) – महापालिका सभागृहात भ्रष्टाचाराच्यासंदर्भात बोलू देत नाही, यावरून माइकसह इतर साहित्याचे नुकसान केल्याने भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व गजानन चव्हाण या दोघांना शुक्रवारी (ता.22) सभेतच निलंबित केले.
या कारवाईमुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर समोरच्या जागेत ठिय्या आंदोलन केले. परिणामी महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी बळाचा वापर करीत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना सभागृहातून बाहेर फरपटत बाहेर काढत पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
अकोला शहरात योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे सुरु असून या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या संदर्भात शिवसेनेकडून चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र महापौरांनी यासंदर्भात लेखी स्वरूपात माहिती देण्यात येईल असे सांगितले. मात्र महापौरांचे हे म्हणणे शिवसेनेच्या नगरसेवकांना मान्य नव्हते शिवसेनेच्या नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शिवसैनिकांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
अधिक वाचा : भाजप सरकारच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत- नितीन गडकरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola