आकोट (प्रतिनिधी)- आकोट येथील तहसीलदार विश्वनाथ घुगे यांची बदली झाल्यानंतर निरोप समारंभ ऐवजी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी तहसीलदार घुगे यांच्या कार्याचा सन्मान सोहळा 21 फेब्रुवारीला पार पडला.
आकोट तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी रुजू झाल्यानंतर तहसील ऑनलाईन केल्याने दलालांना आळा बसला. तसेच संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना, अन्न पुरवठा विभागातील विविध योजना ह्याचा लाभ खर्या लाभार्थ्यांना मिळण्याकरिता त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. याच कार्यकाळात त्यांना उत्कृष्ट तहसीलदार म्हणून शासनाकडुन सन्मानित करण्यात आले. दरम्यान त्यांची बदली झाल्यानंतर आकोट शहर व तालुक्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांच्या माध्यमातून तहसील कार्यालय गाठून तहसीलदार घुगे यांचा शाल व श्रीफळ देऊन लाभार्थी व वयोवृध्द नागरिकांनी सन्मान केला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे,गजानन जायले यांनी सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ दिले.
याप्रसंगीउपविभागीय अधिकारी उदय राजपूत, नायब तहसीलदार राजेश गुरव यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार विजय शिंदे,रामदास काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम माला विक्रम जायले, सोपान पोहरे, विजय अंभोरे, रणजीत कहार, नितीन काकड, सलीम शेख, गजानन जायले, पिंटू वानखडे, लाला कोटक, गणेश तिव्हाने आदींसह महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात हजर होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola