अकोला (प्रतिनिधी) – देशाच्या रक्षणासाठी कोणत्याच आमदार व खासदार यांची मुले सैन्यात भरती झालेली नाहीत. ज्यांच्याकडे शेती नाही, तीच मुले सैन्यात भरती होतात, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
मूर्तिजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित तिरंगा रॅलीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, हातात मेणबत्ती घेऊन पाकिस्तानचा झेंडा जाळून हुतात्मांना श्रध्दांजली देण्याचा देखावा करू नका. मनात देशभक्तीची भावना जागवा. एकीकडे शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे देशाचा जवान सीमेवर हुतात्मा होतो, हे चक्र थांबवावे लागेल. याकरिता भारतातल्या लोकप्रतिनिधींनी आपली मुले देशाच्या रक्षणासाठी पाठवावी.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर, निलेश ठोकळ, गोविंद गीरी, प्रताप तायडे, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष संतोष इंगोले, अनिकेत इंगोले, सागर पुंडकर, विवेक बांबल, संदीप कोल्हाळे, गजानन खांडेकर, दिनेश गोस्वामी, अंकुश हरणे, संजय गुप्ता, संग्राम ताथोड, भुषन ठाकुर, मिलींद चोटमल, शाम ढोरे, उमेश कोरडे, धीरज बांबल, शेख अब्बास, मधुकर सरदार, अमित वानखडे, शिल्पा बाजड, सुनिता बाजड, स्वाती बाजड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाच्या प्रमुख अळसपुरे यांच्या बदलीच्या विरोधात प्रहार उभारणार लढा !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola