अकोला (प्रतिनिधी)- अकोल्याचे वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पांडेय यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बदलीचे आदेश बुधवार, २० फेब्रूवारी रोजी अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. वर्तमानपत्रांचे संपादक व प्रतिनीधींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचा अपमान केल्याचे प्रकरण पांडेय यांना भोवल्याची खमंग चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
शासनाने बुधवारी राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाºयांच्या बदल्या केल्या. यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचाही समावेश असून, त्यांची बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तपदावर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांना अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. पांडेय यांना बीड येथे एम. देवेंदर सिंह यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे. मोर्णा महोत्सवाच्या अपयशाचे खापर माध्यमांवर फोडून वर्तमानपत्रांचे संपादक व प्रतिनीधींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचा अपमान केल्याप्रकरणी शासनाने पांडेय यांची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानूसार अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अकोल्यात दिवसभर चौकशी करून तसा अहवाल राज्याचे मुख्य सचिव यांना सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगानेच त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करावी : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola