अकोट(प्रतिनिधी) – लोकजागर मंच अकोटच्या पुढाकाराने शिवजयंती निमित्य बस स्थानक, छत्रपती शिवाजी चौक, जयस्थंभ चौक, गवळीपुरा चौक व यात्रा चौकात रांगोळ्या व दिव्यांची रोषणाई करून व मुख्य मार्गावरील प्रत्येक दुकानदार-व्यावसायिक व रहिवाशांना प्रत्येकी पाच पणत्या देऊन सांयकाळी दिव्यांची रोषणाई करत छत्रपतींना अभिवादन करण्याची विनंती करण्यात आली. पाच हजार पणत्यांचे प्रजवलन करत अकोट वासीयांनी या एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वराज्य निर्मात्याला अभिवादन केले. व लोकजागर मंच च्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. स्थानिक नरसिंग रोडवर मध्ययुगातील थोर समाज सुधारक कवी गुरू रविदास यांची जयंती निमित्य अभिवादन व पुलवामा घटनेतील शहीद जवानांना समूहाच्या वतीने श्राद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रे निमित्य शीतपेय व पिण्याच्या पण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या अभिनव उपक्रमाकरीता लोकजागर मंच तालुका अध्यक्ष अनंत सपकाळ,जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, शहर कार्याध्यक्ष आकाश बरेठिया, ता.कार्याध्यक्ष राजू गावंडे, उपाध्यक्ष योगेश जायले, मयूर भगत, देवा कायवाटे, अभिजीत कोकाटे, सूरज शेंडोकार, सुहास पवार, अर्जुन गाळखे,पवन जाधव, सौरभ थिटे, अक्षय मामनकार, शाम पाथ्रीकर, विशाल मामनकार, मिलिंद कावरे, नरेंद्र गवई, पवन पालेकर,राहुल सोनार, रूषी मडावी, मंगेश वाघ, साहिल हापसे, मंगेश राणे,अक्षय कोमटवार,आकाश अस्वार, अक्षय पेढेंकर, प्रेम पाटील, हर्षल केदार, आकाश लोणे, महेश शिदखडे, शुभम नेमाडे, अभिषेक पेढेंकर, शुभम कोमटवार,शुभम नंदाने,शुभम कोथळकर, रोहीत कोथळकर,मनिष मंगळे, शिवा पोटे, केशव लोखंडे , शाम राठी आदींनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : तुलंगा बु येथे शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola