अकोला(प्रतिनिधी) – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आज वैध मापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक ज्ञानदेव सोपान शिंबरे (५०) याला ७ हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.
अकोला येथील एका व्यावसायिकाने आपल्या तीन वाहनांचे अंशांकन करून व्यवसाय करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची सदर निरीक्षकाकडे मागणी केली होती. यावेळी शिबरे याने तक्रारकर्त्याला ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ७ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारकर्त्याने स्थानिक लाच लुचपत विभाग अकोला यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शहानिशा करून लाच लुचपत विभागाने आज स्थानिक निरीक्षकाच्या कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारत असताना रंगेहाथ आरोपी निरीक्षकला पकडले. सदर कारवाई श्रीकांत धिवरे , पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गोर्ले, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, अकोला, ईश्वर चव्हाण, पोलीस निरीक्षक, पोहवा गजानन दामोदर, पोहवा , पोना सुनील राऊत, पोशि राहुल इंगळे, पोशि सुनील येलोने, पोशि सचिन धात्रक, पोशि निलेश शेंगोकार, चालक प्रवीण कश्यप, सर्व -लाप्रवि अकोला यांनी केली.
अधिक वाचा : शिर्ला ग्रामपंचायत लिपीक दोन हजारांची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola