हिवरखेड (बाळासाहेब नेरकर) – कर्मयोगी गाडगेबाबा शिक्षण क्रीडा बहुद्देशीय संस्था हिवरखेड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वित्तीय शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज व कर्मयोग गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कार्यमचे अध्यक्ष म्हणून प्रा निखिल भड तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून विशाल मांडवे व प्रमुख उपस्थिती मध्ये अभिजीत कराळे उपस्थित होते. प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन विशाल मांडवे यांनी गुंतवणूकीचे विविध मार्ग, पैशाची बचत व सरकारच्या विविध उपयोगी योजनाची माहिती दिली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. निखिल भड यांनी संस्थेच्या उपक्रमांबद्दल माहिती देत शिवाजी महाराजांच्या आर्थिक धोरणाविषयी युवकांशी चर्चा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अभिजीत कराळे यांनी व संचालन आदित्य भोपळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेचे समस्त पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने उपस्थित युवकांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : जय बजरंग व्यायाम शाळे तर्फे शिवजयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola