अकोला (प्रतिनिधी) – गत दीड महिन्याच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात अकोल्यातील एक बळी गेला असून, पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. मागील १५ दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णाची नोंद झाली नसली, तरी आरोग्य विभागातर्फे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाइन फ्लूने पुन्हा अटॅक केला असून, दीड महिन्यातच जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे अकोला विभागात १० संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जानेवारी महिन्यात यातील एकाचा बळी गेला. अशातच गत दीड महिन्यात राज्यात स्वाइन फ्लूचे १७ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा : दानापुर येथील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola