अकोला (प्रतिनिधी) – स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचे किमतीमध्ये होत असलेल्या वाढीवर बायोगॅस हा उत्तम पर्याय ठरतो. तसेच या बायोगॅसच्या माध्यमातून जैविक खताची निर्मिती होते. त्याकारणाने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीचा प्रयोग अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या यावलखेड येथे उभारण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात गावांमध्ये घरोघरी बायोगॅसचा वापर होताना पाहायला मिळेल.
इंधन व जैविक खत यासाठी बायोगॅस सयंत्र हे उद्योगाचे रूप आहे. मानवी मलमूत्र, पशु निविष्ठा व शेतातून प्राप्त होणाऱ्या बायोमास यातून गॅसचे उत्पादन झाल्यास गावात स्वच्छता राहते. बायोगॅसमुळे वातावरणातील अशुद्धी व पर्यावरणाचे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी करणे शक्य होऊ शकते. हाच उद्देश ठेवून केंद्र व राज्य सरकारने बायोगॅस योजना राबवली. सरकारने त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रम आखला.
या कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व जमाती आणि सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी ही योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत पुरवली जात आहे. या योजनेला यशस्वी करण्यासाठी इंदोर येथील राष्ट्रीय बायोगॅस प्रशिक्षण व विकास संस्था यांचे अधिकारी हा प्रकल्प थेट शेतकऱ्यांच्या घरीच उभारत आहेत. यासाठी संस्थेचे प्रकल्प अधिकारी आर. एस. पवार व प्रशिक्षक प्रशांत परदेशी याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे. प्रकल्पअधिकारी प्रात्याक्षिकाद्वारे बायोगॅस उभा करून दाखवत आहेत. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाने उभा राहिलेला. हा बायोगॅस ग्रामीण भागांमध्ये घरोघरी पाहायला मिळणार आहे.
अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या यावलखेड येथील नितीन पांडे यांच्या घरी प्रात्यक्षिक व प्रत्यक्षरीत्या बायोगॅस सयंत्र उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बायोगॅस बांधणाऱ्या गवंडी व लाभार्थी यांना प्रत्यक्षपणे बायोगॅस कसा बांधायचा आणि त्याचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा बायोगॅस बांधून पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोपाल बोंडे, कृषी अधिकारी संजय चांदुरकर, मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, बाळापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुंदडा, विस्तार अधिकारी महल्ले, सुनील गावंडे, गजानन गावंडे, मनोज मोटे यांच्यासह आदी जणांनी भेट दिली.
अधिक वाचा : टॅक्स’च्या मुद्यावर १२ आठवड्यांत निर्णय घेऊ; राज्य शासनाचे नागपूर हायकोर्टात उत्तर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola