हिवरखेड (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुका कुणबी युवक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी पुरुषोत्तम इंगोले यांची नियुक्ती झाल्यापासूनच त्यांनी समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचे सत्कार , शेतकऱ्यांचे प्रश्न असोत ,समाजतील तरुणांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली असेल मग ती नोकरी असो की राजकीय ज्यामुळे समाजाची प्रतिष्ठा वाढत असेल अश्या सर्व तरुणांचे सत्कार घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आज कुणबी युवक संघटनेच्या माध्यमातून होत आहे.
आज सर्वच स्तरावरून कुणबी युवक संघटना आपले कार्य करत आहे याच अनुषंगाने हिवरखेड येथे सर्व शाखीय कुणबी युवक,जेष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हिवरखेड येथे परपडलेल्या या बैठकीमध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जगतगुरू तुकाराम महाराज प्रबोधन समिती कडून वर्षभर राबविण्यात येणारे नवनवीन उपक्रमा बाबत माहिती देण्यात आली. तसेच तेल्हारा तालुका कुणबी युवक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी पुरुषोत्तम इंगोले याची निवड झाल्या मुळे त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .समाजात आदर्श विवाह करणाऱ्या युवकांचे सत्कार यावेळी घेण्यात आले त्यात राजेश महोकार व अमोल धांडे यांना रमेश दुतोंडे यांच्याकडू 1100 रुपयांच्या भेटवस्तु देऊन सत्कार केला, भारिप तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्द संदीप इंगळे ,खरेदी विक्री मध्ये निवड झाल्याबद्दल अनिल कराळे यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वासुदेवराव निंबोकार हे होते तर अभंग पिठावर पुरुषोत्तम(नाना) इंगोले,महेंद्र कराळे सर , रमेशजी दुतोंडे,संदीप इंगळे, रामकृष्ण पंचबुद्धे, नंदुभाऊ शिंदपुरे, अनिल कराळे, गोकुळ हिंगणकार, बंटी राऊत,गजानन गायकवाड,निलेश जवकार कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास घुंगड सर यांनी केले तर आभार मनीष गोरद सरांनी केले.
अधिक वाचा : अकोल्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल रॅली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola