तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती यांच्या वतीने शहरात भव्य मोटारसायकल रॅली शिवजयंतीच्या पर्वावर काढण्यात आली होती.यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील युवक ,युवती,पुरुष,महिला यांची उपस्थिती लाक्षणिक होती.स्थानिक शिवाजी हायस्कुल येथून सकाळी १० वाजता सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गावरून जय भवानी जय शिवाजी घोषणा देत रॅली काढण्यात आली रॅलीचा समारोप स्थानिक आर आर पाटील शाळेत करण्यात आला.यावेळी पुलवामा दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदाना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली.तसेच सायंकाळी भव्य शोभा यात्रा निघणार आहे.